STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*तृणातील इवले फूल*

*तृणातील इवले फूल*

1 min
14.6K



तृणातील इवले फूल

नाजूक अन देखणे

किती सुंदर लोभसवाणे


तृणातील इवले फूल

डोलतेय वार्‍यावर

घनदाट माळावर


तृणातील इवले फूल

श्यामरंगी शोभून दिसते

सोनेरी किरणात नहातेय


तृणातील इवले फूल

तृणातून डोकावतेय

मधूर आवाजात गुणगुणतेय


तृणातील इवले फूल

आला मस्त,उनाड वारा

फुला किती तुझा तोरा


तृणातील इवले फूल

तू भावतोस मज मना

खुणावतोस तू पुन्हा पुन्हा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational