STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

3  

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

तक्रार...

तक्रार...

1 min
267

खूप तक्रारी आहेत माझ्या

आजवर जगलेल्या या आयुष्याशी

अघटित काही घटनांशी

उरल्या सुरल्या त्या दुखऱ्या क्षणांशी...


काय होता माझा गुन्हा

चालण्या मला काटेरी वाट दिली

आज आहे सरणावर जळत्या

मग काया माझी का फुलांनी सजली...


प्रत्येक क्षण मला हवा होता

नसला सुखाचा तरी किमान आनंदाचा

पण आयुष्या.. तू हिसकावला तोही

रचून सापळा त्या असहनीय यातनांचा...


आज रडणारी असंख्य भोवती

पण रडताना मी कोणीच नव्हता कसा..? 

मेल्यावरच का येतात जवळ आपले

खरच आयुष्या तू आहेस तरी कसा..?


आहेत माझ्या असंख्य तक्रारी 

आयुष्या फक्त आणि फक्त तुझ्याचकडे

नाही जमले कधी कुणाला हसवणे 

तर किमान कुणाला रडवू नकोस गडे.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational