ती..!
ती..!
ती जणू रात्र होती
शीत चांदण्यांनी बहरलेली.
ती जणू सुगंध होती
निशिगंधाने दरवळणारी.
ती जणू लकेर होती
वार्याच्या लहरीतून येऊन
कानी विरुन जाणारी
ती जणू गीत होती
हृदय अलगद हेलावणारी.
ती जणू साथ होती
आजची अन उद्याचीही
ती जणू हात होती
पुसण्या माळ अश्रुंची.
ती जणू रंग होती
आयुष्य रेखाटणारी.
ती जणू हाक होती
साद मजला घालणारी.
ती जणू उमेद होती
आयुष्य हे जगण्यासाठी.
ती जणू ओंजळ होती
भरभरुन देण्यासाठी.
ती जणू मात होती
संकटाना पेलणारी
ती जणू वात होती
स्वयंप्रकाश देणारी
ती जणू शब्द होती
स्पष्ट आणि बिनचूक अशी
ती जणू स्वप्न होती
आठवणींची श्रृंखला जशी..........
