STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

ती...

ती...

1 min
241

वर्षामागून वर्ष सरले

सोडा जुने आचार-विचार;

वंशाच्या तेजस्वी पणतीचा

करू सर्वजन स्वीकार.

ती 'कल्पना' ती 'सुनीता'

अवकाश जिंकणारी गजगामिनी;

रणी तळपणारी तलवार

झाशीची ती रणरागिणी.


जोतिबा-साऊने केला

स्त्रीजातीचा उद्धार;

जिजाऊंनी दिला स्वराज्यास

"शिवबा"सम आधार.


लेक- माता- बहीण- पत्नी

तीच आपली जीवनसखी;

तीच सीता तीच द्रौपदी

नाही कोण तिच्यासारखी.


स्वर्गलोकातील ती देवता

का घेता तिचा बळी?

फुलू द्या तिला, तोडू

नका गर्भातील कळी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational