STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

ती वेळ पुन्हा यावी

ती वेळ पुन्हा यावी

1 min
287

सुखाच्या कुलूपाची हरवली आहे चावी

उरलेल्या आयुष्याची काय हमी द्यावी ?

अचानक अशी भयंकर लाट ही का यावी

स्वप्नांची रांगोळी क्षणात का पुसून न्यावी

घडते आहे जे असे नव्हतेच कधी गावी

घुटमळलेल्या श्वासा सांगा कशी गती द्यावी.

जावोत हेही दिवस आणि पहाट नवी व्हावी

रुतलेल्या चाकाची पुन्हा धाव ती वाढावी

जुने जाऊ दे मरणालागुनी गोष्ट तिथेच संपावी

घडी बसावी नव्याने जीवनी पुन्हा ती वेळ यावी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational