STORYMIRROR

Pranali Kadam

Inspirational

5.0  

Pranali Kadam

Inspirational

ती सांज डोकावून आली

ती सांज डोकावून आली

1 min
1.7K



साज शृंगार लेवून आली माझी साजणी

हृदयाचा ठोका आज ती चुकवू लागली


झालो घायाळ मी तिच्या नव शृंगारात

सखी, अशी कशी ही तुझी जादू झाली


नाकातील नथ स्पर्श करीत तुला गेली

ओठांचा अलगद चुंबन ती घेऊ लागली


नववारीतली भासली मला तू चंद्रमोळी

काळ्या साडीवर चांदणी ती विसावली


इंगळी डसावी अशी तू मनात बसली

अन् हृदयाची किणकिण वाजू लागली


लांब केसातील सरसरणारा तो मोगरा

परिमळ श्वासांना अलगद स्पर्शून गेली


दोन जीवांची ही अधूरी ही मिलनगाठ

पूर्ण न होता रात्रही बघ दुःखी झाली


खोटेच तुझे वादे मला खुणवू लागली

सौंदर्याची जादू मला आज फसवून गेली


पुन्हा कधी येशील हा तर वादाच राहिला

तुझ्या पाऊलखुणा मला चिडवू लागली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational