STORYMIRROR

Gauri Kulkarni

Drama Inspirational

3  

Gauri Kulkarni

Drama Inspirational

तिची वेगळी वाट

तिची वेगळी वाट

1 min
259

तिची वाट नेहमीच आडवळणाने  जाणारी

वेगळ्याच अशा जगाशी स्वतःच नातं सांगणारी

सगळ्यांना वाटे ही अशी कशी आहे वेगळी

आमच्यात असूनही आमच्यापेक्षा निराळी

कुणीतरी एकदा खोदून खोदून तिला विचारलंच 

काय चालू असतं गं त्या बंद दारामागे तुझं

दीर्घ श्वास घेऊन मंद हसून तिनेही सांगितलंच

माझ्या मनात चालू असतं एक द्वंद्व माझ्याशीच माझं

शोध घेण्यासाठी स्वतःचा, त्याचा आणि तुझाही

समोरची व्यक्ती नकळत पुटपुटली काहीबाही

मग ती बोलली पुढे असं काही

घाबरु नकोस मी काही तुमच्यात येणार नाही 

तुमची सरावाची चौकट मोडणार नाही

माझ्या दारामागच्या जगात खुश आहे मी

वेगळं तरीही समाधानी जग रोज अनुभवतेय

त्यांच्यात राहून सगळी स्वप्नं भरभरून  जगतेय

तुला कधी समजणार नाही माझी ही भाषा

उगाच माझ्याकडून ठेऊ नकोस चारचौघींसारख्या आशा

माझं आसमंत खुणावत आहे मला कधीपासून 

आता मीही तयार आहे भरारी घेण्यासाठी पंख पसरून...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama