मैत्री
मैत्री
1 min
244
भेटू आपण पुन्हा एकदा
अनोळखी त्या वळणावर
जमवू मैफिल तीच जुनी
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर
तु तुझं सांग नवीन काहीतरी
मीही बोलेनच माझ्या स्वप्नांवर
तुझ्या डोळ्यात दिसु दे नवी पहाट
माझ्या मनालाही मग सापडेलच वाट
नव्याने पटेल मग जुनीच खूण
तुला मी मला तू काढू आपण शोधून
आपली मैत्री बहरेल एकमेकींना भेटताना
उंच उंच मग जाईल झुला सोबतीने फुलताना....
