STORYMIRROR

Gauri Kulkarni

Abstract Others

3  

Gauri Kulkarni

Abstract Others

तुझं माझं नातं

तुझं माझं नातं

1 min
278

तुझं माझं नातं

अनोळखी तरी ओळखीचं

मनाच्या हिंदोळ्यावर

झुलणाऱ्या सोबतीचं


तुझं माझं नातं

आंबट गोड कैरीचं

जिभेवर रेंगाळणाऱ्या

आठवणीतल्या चवीचं


तुझं माझं नातं

खुदकन हसणाऱ्या खळीचं

नजरेतूनच समजणाऱ्या

हृदयाच्या नाजूक धाग्याचं


तुझं माझं नातं

उंच जाणाऱ्या झोक्याचं

आभाळाला भेटूनही

जमिनीवर टेकणाऱ्या पायाचं


तुझं माझं नातं

शांत तेवणाऱ्या समईचं

स्वतःला सतत जाळून

दुसऱ्यांना उजळण्याचं


तुझं माझं नातं

अव्यक्त अशा कवितेचं

माझ्या लेखणीतून झरणाऱ्या

शब्दांमागच्या भावनांचं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract