STORYMIRROR

Gauri Kulkarni

Inspirational

4  

Gauri Kulkarni

Inspirational

आव्हान

आव्हान

1 min
417

मागे वळून पाहताना आजही ती गोंधळते 

जबाबदारीच्या ओझ्याने जराशी बावरते


जमेल गं तुला असं स्वतःलाच समजावते

अन् नव्याने आलेल्या आव्हानाला हसत हसत स्वीकारते


पुन्हा प्रयत्न करते चुकता चुकता शिकू लागते

इतरांच्या नजरेतून स्वतःला बघताना कधी कधी हरवते


पण प्रतिबिंब तिच्या डोळ्यातले तिला पुन्हा सावरते

स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पंखांना परत एकदा बळ देते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational