STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Romance Tragedy

तिची आठवण ..

तिची आठवण ..

1 min
14.3K


तिची आठवण जणू  ..

भावनांची सुंदर साठवण ..

तिचं अल्लड, अवखळ वागणं ...

मुद्दामहून मागून हाक मारणं

तिचं स्थळ, काळ, वेळेच भान नसणं 

अन भविष्यविषयी भरभरून बोलणं ...

हसताना तिच्या गालावरची खळी पाहणं ...

सर्वकाही सुंदर, अनुपम ... हवंहवंसं...

आठवणींची शिदोरी ..पुरून उरणारी...

कधी आल्हाददायक तर कधी क्लेशदायी   

तिच्या विषयीची प्रेम, नाजूक भावना...

असण्या- नसण्याच्या संमिश्र सहवेदना

विसरणे नंतरची प्रक्रिया असते आठवण

स्मरण - विस्मरणाच्या पलीकडची ती... अन

तिच्याविषयीची त्या भावना नाजूक तर कधी ...

जीवघेण्या आठवणींची जणू अखंड मालिकाच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance