Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

तारणहार..

तारणहार..

1 min
169


तुम्हीच आमचे तारणहार 

अन् तुम्हीच आमची छाया ;

स्वराज्यातील सकलजनांना

लावली अखंड माया .


महाराष्ट्राच्या पावन मातीत 

सदैव तुमचा दरवळ ;

धगधगता इतिहास देई 

आम्हां संघर्षासाठी बळ .


"जाणते राजे " तुम्ही

होता कारुण्याची मूर्ती ;

निपचित पडलेल्या समाजा

दिली तुम्हीच स्फूर्ती .


शूरवीर- परमप्रतापी तुम्ही 

थोर तुमचा मराठी बाणा ;

बलाढ्य शत्रूही लोळविला

 असा तुमचा गनिमीकावा .


जातीधर्माला थारा न देणारे

पाळला आपण शिवधर्म ;

मराठी मन -अस्मिता जागी 

करण्याचे केले सत्कर्म .


 तुमच्याविन अवघा महाराष्ट्र 

झालाय पुरता सुनासुना ;

आमच्या मनी एकच आस

 राजे तुम्ही जन्माला यावे पुन्हा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational