।।स्वप्न।।
।।स्वप्न।।
आयुष्याच्या संध्याकाळी। आठवतेस तू कातरवेळी।।
तोच पार अन तीच आगासी।
तेच स्वप्न अजून उराशी।।धृ०।।
क्षणभर येते मनात अजुनी।
रोज फुलांचा गजरा होऊनी।।
मोकळ्या केसात फुलावे। वेणीवरती खूप झुलावे।।
गंध फुलांचा घेऊन जराशी।
धुंद होऊनी ये जराशी।।१।।
तोच पार अन तीच आगासी।
तेच स्वप्न अजून उराशी।।
गतकाळाची आठवण येते।
मन हिंदोळ्यावर झोके घेते।।
नदी किनारी काठवरती।
स्वप्न पाहतो घाटावरती।।
फुलपाखरू होऊन जराशी।
नदी किनारी ये जराशी।।२।।
तोच पार अन तीच आगासी।
तेच स्वप्न अजून उराशी।।
मला वाटते रोज फुलावे।
भ्रमर होऊनी फुलात बसावे।।
कळी होऊनी गोड हसावे। मिठीत तुझ्या मी रोज असावे।।
कधी भेटशील मला जराशी। बांधून फिरतो स्वप्न उराशी।।३।।
तोच पार अन तीच आगासी।
तेच स्वप्न अजून उराशी।।