स्वप्न
स्वप्न
स्वप्न हवे गंधाळलेले
प्राजक्ताच्या सड्याप्रमाणे
भाव मधुर गुंफलेले
राधेच्या प्रीतीप्रमाणे
मृत्तिकेचा सुगंध व्हावा
तनामनात झिरपणारा
मुखड्यावरचे तेज जणू
चंद्राला लाजवणारा
तुझी माझी प्रीती ही
बंध सारे तोडलेले
डोळे असे आरस्पानी
प्रतिबिंब सांडलेले
कवेत तुझ्या येता
भास जणू स्वर्गाचे
ओथंबलेल्या अधरातून
मळे वहावे सुगंधाचे
मधुगंध आपल्या प्रीतीचा
सर्वांगसुंदर जाणिवेचा
स्वप्नातले हे नजराणे
देशील का प्रियतमा. ??
ओढ तुझ्या सनिध्याची
गळा गुंफले हात तुझे
श्वासा मध्ये श्वास गुंफूनी
तुझा नी माझा भेद नसे
तुझ्यातच सारे विश्व भासे

