STORYMIRROR

Pandit Warade

Fantasy

3  

Pandit Warade

Fantasy

स्वप्न माझे

स्वप्न माझे

1 min
7.6K


जगात मजला उंचावरती

स्वप्न गुलाबी घेऊन जाते

विविध तऱ्हेचे स्वप्न माझे

सौख्याचे क्षण देऊन जाते


जग हे सारे सुंदर आहे

सांभाळावे तयास सुंदर

ईश्वर निर्मित सजीव सारे

सदैव व्हावा त्यांचा आदर


सुंदरसे एक घर असावे

घरात माया प्रेम असावे

कुठल्याही कारणाने तेथे

कधी एक भांडण नसावे


सुखी शांत अन् आनंदाने

माणूस येथे नित्य जगावा

सदैव त्याने प्रेम करावे

द्वेष कुणाचा कधी न व्हावा


कुणास त्रासाचे ना व्हावे

जगणे माझे असे असावे

देवालाही गर्व असावा

पुत्र लाडका मला म्हणावे


असे स्वप्न मज पडो नेहमी

सकळ जन हे सुखी बनावे

धन्य व्हावा मानव जन्म हा

सुखदुःखात प्रेमाने रहावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy