स्वातंत्र्य दिन...
स्वातंत्र्य दिन...
गगनी फडफडतो हा तिरंगा
ही या देशाची शान हो,
होतो साजरा आनंदाने
हा स्वातंत्र्य दिन हो...
शूरवीरांनी दिले बलिदान
या भारतमातेसाठी,
दिले स्वातंत्र्य मिळवून
किर्ती त्यांची मोठी
त्या वीरांच्या शौर्याचा, आम्हा अभिमान हो...।
प्राणापेक्षा प्रिय असे ही
आम्हा ही भारतमाता,
या मातेच्या चरणी आम्ही
टेकवितो हा माथा
गाऊ महती या देशाची, गाऊ गुणगान हो...।
नांदती सारे इथे सुखाने
सारेच भाऊ भाऊ,
जात पात नि धर्मभेद
सोडून सा
रेच देऊ
भारतभूमी ही शूरवीरांची ही संतांची खाण हो...।
सीमेवरती लढतो जवान
पर्वा न करता जीवाची,
देऊन बलिदान करतो
रक्षा भारतमातेची
रक्षण करण्या भारतमातेचे देऊ हा प्राण हो...।
या मातेला करून वंदन
शपथ सारेच घेऊ,
रक्षण करण्या भारतभूचे
एकजुटीने सारे राहू
जगू-मरु आम्ही देशासाठी देऊ बलिदान हो...।
वंदन करूया भारतमातेला
तिरंगी या ध्वजाला,
देशासाठी दिले बलिदान
त्या अमर हुतात्म्यांना
देई आम्हा प्रेरणा तो सीमेवरचा जवान हो...।