स्वामी माऊली
स्वामी माऊली
स्वामी आपल्या कृपेची असू द्यावी सावली
तुम्ही अनाथ दुःखी जनाची माऊली
स्वामी केले हे मन तुम्हास स्वाधीन
जाऊ नका देवू दुष्कर्माच्या अधीन
जप असावा मनी स्वामी नामाचा
छंद लागावा तुमच्याच भक्तीचा
स्वामी आई फार मन हे दमले आहे
भीतीचे घन मनी दाटले आहे
हे उदार माऊली आलो तुमच्या चरणी
सदैव तुमचाच वास असू द्यावा माझ्या मनी
