सूर्य कोपता वैशाखी
सूर्य कोपता वैशाखी
सूर्य तापला नभात
अंग घामाने भिजले
धाप लागता उन्हाची
बळी छायेत निजले ||१||
धरा व्याकुळ फाकली
झाली वैशाख काहीली
पानगळ रानोमाळ
पक्षी आकाशी उडाली ||२||
थेंब ओढ्यात आटला
तळ विहीरी दिसला
सुकी वैरण गव्हाणी
घास घशात रुतला ||३||
नभी काळोख भरला
वारे थैमान घालती
नाचे मयूर वनात
दूर डोंगर हासती ||४||
सूर्य कोपता वैशाखी
चैत्री पालवी फुटली
होता नशिबी दुष्काळ
सुखे दुथडी सजली ||५||