STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Abstract Others

2  

Vikramsingh Chouhan

Abstract Others

।।सूर।।

।।सूर।।

1 min
13.5K


आज माझे तुझे सूर का जुळले

शब्द ओठातूनी अमृता सांडिले

नभ निळे भक्तीने बहरुनी आले

चिंबुनी मन नाचले रे साई चिंबुनी मन नाचले ।।धृ।।

साई नामाचा गजर घुमला                 

धुंदीत भक्त सांग का नाचला

विसरुनी घर दार चरणी तुझ्या आलारे

भक्ती आणि शक्तीला शरण आज गेलरे

हात दे साथ दे मार्गी लागू दे            

पडत्याला आधार दे रे साई,पडत्याला आधार दे।।१।।

साई नामाचा महिमा गाजला

लौकीकतेचा झेंडा त्रिलोकी फडकला

चमत्कारांचा तो साक्षी आज झाला रे

श्रद्धा आणि सबुरीचा ठेवा उरी जपला रे

हात दे साथ दे मार्गी लागू दे

पडत्याला आधार दे रे साई,पडत्याला आधार दे।।२।।

साई नामाचा डंका वाजला

आसमंत निळा गार्जुनी बरसला

भक्ती भावनेने हे साई नाम घेवू रे

सूर आणि तालात साई गीत गावू रे

हात दे साथ दे मार्गी लागू दे

पडत्याला आधार दे रे साई पडत्याला आधार दे।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract