सुरातले सुरे
सुरातले सुरे
तुझ्या मैफलीला शहारे दिलाचे.
सुरा ती चढेना इथे शोर ह्याचे.
कळालेच नाही जमावात होते.
सुरांच्याच पाठी सुरे चोरट्याचे.
हमामा स नाही हलालास आले.
लपूनीच होते नखे श्वापदाचे.
सुरांची नदी ती, नदी भोवती ते.
तुझे गान जैसे सूरं नाविकाचे.
नहाता नहाता दिलाला दिले हो
तिथे त्या सुरांचे पुरेपूर साचे.
तरोताज झाले तराने पहाटे.
सुटेनाच गुंते तुझ्या संगिताचे.
सुरे ही सुराने सराबोर सारे.
उरी पाश श्रृंगार ते दीपिकाचे.
नि गेले सुरे ते बघाया असे हे .
कुठे रे कधी का असं फुकटाचे.
दिशेला बघा ते शराबी जमा हो.
हळूवार प्याले, तळीराम याचे.
सभेला नसे ह्या जरा ही तमा हो.
कशाचे सुरे कोणते काम त्याचे.
गळाले सुरे आतल्याआत गात.
नि प्यालेच आता रिते हो कराचे.

