STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational

4  

Supriya Devkar

Inspirational

सुगरण

सुगरण

1 min
304

सुगरण असते ती 

तीची असतात अनेक रूपं 

स्वयंपाकघरात अविरतपणे 

चालतो तिचा जप,

कधी तिखट फोडणी देते  

 कधी गुळाचा खडा टाकते !

कधी चिंचेसारखी मध्येच 

अंबट अविट गोडी देते !

कसे असते तिचे जिवन 

सर्वांभोवती आखलेले

खाऊ घालते सार्यांना.. 

अनुभवातून शिकलेले

विचारून बघा कधी तिला

तिची आवडती चव !

स्वयंपाकघरातून बाहेरच    

कधी तिलाही काही हव

नसतात तिच्या काहीच     

अपेक्षा खूप मोठ्या 

कुटुंबाशी जोडलेली नाळ  

अन वाटा तिच्या खूप छोट्या..

ती कधीच बोलत नसते मात्र 

तिच्या हातची चव बोलते

थोड्याशा कौतुकाने सुद्धा

तिची कळी आनंदाने खुलते !!

थकल भागलेल शरिर तिच

कधीच मागे हटत नाही 

चुलीवरच्या जेवणाशिवाय 

तिला काही पटत नाही ..

जिभेचे चोचले पुरवते 

मग कांदा भाकरी का असेना 

तिच्या हातून घडले कार्य

कधी कोना ना दिसेना !

तिचा जागर अखंड घडतो

होता तुम्ही जेव्हा तृप्त 

जागृत होते कुडंलिनी तिची

दिसती तिचे गुण सुप्त !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational