स्त्री तुझा हक्क
स्त्री तुझा हक्क
भित्री भागूबाई अजून
घाबरणार तू किती
गलिच्छ परंपरेचं जोखड
सोडणार तू कधी
शिळ्या अन्नाचे
आस्वाद घेणार तू किती
जननी, जन्मदात्री आहेस
कित्ता हा गिरवणार तू कधी
हालअपेष्टा कुटुंबासाठी
सीमेबाहेर सोसणार तू किती
त्यागाचे तुझ्या निरांजन
जगाला कळणार तरी कधी
मूक बनून तमाशा हा
श्रोता बनायचा तरी किती
हक्काची आणि अधिकाराची
मालकीण होणार तू कधी
दुय्यम दर्जा स्रीजातीचा
भोगशील तू किती
म्लेच्छ रूढ़ी बंधनाचे
गांठोडे सोडशील तू कधी
मुक्तपंखाने घे भरारी
आकाशाला गवसणी घाल तू
माणूस म्हणून जगण्याचा
मनसोक्त आस्वाद घे तू
कवयित्री नालंदा वानखेडे,
नागपूर
