स्त्री जन्म
स्त्री जन्म

1 min

66
स्त्री जन्म म्हणजे असचं असायचं
लहानाचे मोठे जिथे व्हायचं
लग्न होताच सोडून घर ते
दुसऱ्यांच्या घरी जायचं।। १।।
ओळखीची नाती सारी सोडून
अनोळखी नात्यांत वावरायचं
माहेरच्या ऋणानुबंधापेक्षा
याच नात्यांना जपायचं।। २।।
आपलं घर समजून
दिवसरात्र घाम गाळायचा
तरीही 'परकी' हाच शब्द
सासरच्यांकडून ऐकून घ्यायचा।। ३।।
आयुष्य संपत आले तरी
भोग नाही संपायचा
नात्यांच्या गावामधुनी
प्रवास निरंतर चालायचा।। ४।।