सर्वोच्च सूचक शिवछत्रपती
सर्वोच्च सूचक शिवछत्रपती
सर्वोच्च सूचक शिवछत्रपती
स्वराज्य वाढती चंद्रकला।
हे सह्याद्रीच्या शिखरांनो
येता जाता झूकत चला ।।धृ।।
शत्रू जो कुणी नजर ठेवील
धरणी मातेच्या कणावर।
त्याच्या नरडीचा घोट घेऊ
जळी- थळी-नभी रणांवर।।
धगधगती क्रांति-मशाल मावळे
गद्दारांना सूचवत चला।।१।।
धमण्यात नेहमी शौर्य धावे
अत्याचाऱ्यांवर चाल करू।
बाजी पासलकर फिरंगोजी री
रण भुमीवर कमाल करू ।।
शिवछत्रपतींच्या तलवारींनो
हर-हर महादेव गर्जत चला।।२।।
