STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

सर

सर

1 min
186

सरसर झाडावर

चढे छोटी खारुटली

किती हिची चपळाई

येई झरझर खाली    (१)


सर मोत्यांचे दिसती

वर्णी सावळ्या खुलून

हौस भारीच बाईची

सारे दागिने घालून    (२)


गड सर तानाजीने

केला मावळे साथीने

गड आला सिंह गेला

वदे भूपती खेदाने     (३)


सर नखाची नाहीच

कुणा ह्या वीरांगनेची

तुल्यबळ नाही कोणी

नको तुलना वृथाचि    (४)


सर किताब मानाचा

मान गुरुजी बॉसना

ज्ञान पद प्रतिष्ठेचा

मान उचित सर्वांना     (५)


येता सर वळवाची

दरवळे मृदगंध

होई गारांचा वर्षाव

दाटे अमाप सुगंध     (६)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract