STORYMIRROR

Rajesh Sabale

Abstract Others

1  

Rajesh Sabale

Abstract Others

।। सर पावसाची।।

।। सर पावसाची।।

1 min
3.3K


आली नभातून कशी, सर पावसाची बाई। 

झाले चिंब ओले मी, या पावसात बाई।।

 

परवड माझी अशी केली, या पावसानं बाई।

वादळ वाऱ्या संगं येई, लई कडाडत बाई।।

 

असा येतो अवचित, करतो नासाडी गं बाई।

हात तोंडाशी आलेले पीक, नासवतो बाई।।

 

जन करी देवा देव, याच्या येण्यासाठी बाई।

डोळे आभाळी लावून, मेघा बघते गं बाई।।

                  

साला मागं सालं गेली, बिन पावसाची बाई। 

एक थेंब पाण्यासाठी, जीव व्याकुळला बाई।।

 

 

 

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract