स्पर्श
स्पर्श
बनून झुळूक गार वाऱ्याची
जवळी तुझ्या येईन
करून तुला हळुवार स्पर्श
पुन्हा माघारी होईन
होऊन कधी पाऊस सांजवेळी
जवळी तुझ्या येईन
ओघळून तुझ्या गालांवरुन
अधरांना हळुवार स्पर्शून घेईन
बनुनी कधी हवासा स्पर्श
जवळी तुझ्या येईन
नजरेनी नजर घट्ट धरून
मिठीत तुला घेईन
कधी तू उलटशील पान ज्याचे
ते पुस्तक मी होईन
स्पर्श तुझ्या त्या हातांचा
मी मनात साठवून घेईन
कधी बनून विचार डोकाविन
मी तुझ्या मनात
मग बनून आठवण रमेन
मी ही तुझ्याच मृगनयनांत

