हरवलेली नाती
हरवलेली नाती
बोटांवर रंग सोडून जशी
फुलपाखरे निसटून जातात
तसं मनात कायमचं फक्त
आठवणीतून अस्तित्व ठेवून..
निघून चाललीत माणसं
आयुष्यातून..
कधी एकत्र घालवले होते
ते सुरम्य सुंदर बालपण
आता त्यांच्या आठवणींनी
डोळ्यांत पाणी देऊन..
निघून चाललीत नाती
आयुष्यातून..
काही सुख दुःखाचे क्षण
हक्काचे, मायेचे क्षण..पण
कितीही आर्त हाक दिली
तरी मागे वळून न पाहता..
निघून चाललीत नाती
आयुष्यातून..
एखाद्या नात्याची कसर अन्
त्या व्यक्तीची रिकामी जागा
कोणी कधी घेऊ शकत नाही
कायमची पोकळी निर्माण करून..
निघून चाललीत माणसं
आयुष्यातून..
आयुष्याची रीतच अशी ही
जरी पुढे जात राहिलो तरी
मनाचा कोपरा हळवा करून
निरंतर दरवळतील मनात जी
निघून चाललीत नाती
आयुष्यातून..
