STORYMIRROR

Nisha Kale

Abstract Romance Fantasy

2  

Nisha Kale

Abstract Romance Fantasy

प्रेम हे

प्रेम हे

1 min
181

व्यक्त अन् अव्यक्ताचा डोह असतं प्रेम

वरवर नितळ तरी आत आत खोल असतं प्रेम


जरा लागला ठाव मनाचा की हळुवार गवसते प्रेम

कधी मौनातून, कधी देहबोलीतून खुलत जाते प्रेम


मोरपिशी स्वप्नांना नाजुक भावनांचे कोंदण प्रेम

सायंकाळी वेळ निळी, सजलेली रातराणी म्हणजे प्रेम


कधी अल्लड झुळझुळ निरव पाण्यासारखे प्रेम

कधी सुरेख सुंदर सुरेल सुगंधी गाण्यासारखे प्रेम


पहिल्या पावसाच्या थेंबाचा अवचित स्पर्श प्रेम

श्रावणातल्या गार वाऱ्याचा गोड शहारा प्रेम


म्हणून व्यक्त अन् अव्यक्ताचा डोह असतं प्रेम

वरवर नितळ तरी आत आत खोल असतं प्रेम



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract