STORYMIRROR

Nisha Kale

Abstract Romance Fantasy

3  

Nisha Kale

Abstract Romance Fantasy

प्रेम तरंग

प्रेम तरंग

1 min
438

ओठी अलगद हसू फुलते

विचार तुझे मनात येता

मनात अलगद तरंग उठतात

तू माझ्या जवळी येता

तू समोर असताना

तुझ्यावरची नजर हटत नाही

तू समोर नसताना तुझ्याशिवाय

मात्र काही सुचत नाही

का वेडाविलेस माझ्या मना

सतत धाव तुझ्याकडे घेई

तू सोबत नसतांना मात्र

तुझ्याच विचारांची ओढ‌ देई

नको अंतर नको दुरावा

दुरावा सारा मिटवून टाक

एकदाच अगदी मनापासून

दे प्रेमाची आर्त हाक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract