बाल दिवस
बाल दिवस
चैतन्याचे वाहते अवखळ झरे
अगणित उत्साहाचे सळसळ वारे
खूप सारे प्रेम अन् डोळ्यामध्ये
निखळ निरागस भाव सदैव वसतो
यांच्याचमुळे आपल्या जगण्यात
जिव्हाळा अन् जिवंतपणा असतो
पंखात बळ भरता झेप आकाशी घेई
उंच भरारी घ्या पिलांनो खूप मोठे होई
