STORYMIRROR

Nisha Kale

Romance

4  

Nisha Kale

Romance

सुगंध दरवळ

सुगंध दरवळ

1 min
440

अल्लड तुझिया कायेवरती जेव्हा स्पर्शला वारा

सुगंध दरवळ ठेवून गेला धुंद होऊनी सारा


तुझे असणे आणिक बोलणे सळसळ वाटे पानी

हास्य तुझे मनमोहक भासे जसा निर्झर वाहे रानी


खळखळणारी नदी जणू तू सजते सप्त सुरांनी

भिजलेले तू उन कोवळे जसे चिंब सोन सरींनी


तुला स्पर्शाया थेंब दवाचे मनात करती हळहळ

तुझा स्पर्श सुखांचे कवडसे अत्तराचा मोहक परिमळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance