STORYMIRROR

Nisha Kale

Romance Classics Fantasy

2  

Nisha Kale

Romance Classics Fantasy

रश्मी

रश्मी

1 min
138


आकाशी चांदणे सांडले

त्यामधुनी नक्षत्र उतरले

बहरला स्पर्शाने निसर्ग ही

कसे आज हे विस्मय घडले


आसमंत दरवळीने भरला

फुल, पाने सुगंधित झाले

अचंबली भ्रमर, पाखरे ही

फुल कोणते उमलून आले


प्रसन्नतेने अवनी सजली

जसे चैतन्य भरून आले

मंद भासली चांदण नक्षी

तेज असे त्या फुला लाभले


रंग फुलाचा जगी सांडता

शिल्प ते साकारले अश्मी

सूर्य उधळतो सहस्त्र हस्ते 

आभा फुलास नाव ज्याचे रश्मी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance