हरीप्रिया तुळस
हरीप्रिया तुळस
एक तुळशीचे पान
असे त्रैलोक्य समान
हरिप्रिया म्हणविते
पांडुरंगा चा ही मान
करे तुळशीची सेवा
आहे वैकुंठीचा ठेवा
देव इंद्रादिक सर्व
पुजे तुळशी गौरवा
धन्य तुळशी महिमा
प्रातःकाळी चे दर्शन
नाम घेता तुळशीचे
पुण्य फळे कोटीयज्ञ
आरोग्यास वरदानी
अतिशय बहुगुणी
घराघरात वसे ती
जणू हक्काच्या स्थानी
आयुर्वेदाची ती खाण
प्राणवायू तोषविते
शुद्ध हवेस ठेवते
सुख शांतता लाभते
तुळशीच्या वृंदावना
करुनिया प्रदक्षिणा
चुके जन्म मृत्यू फेरा
नुरे जगण्याच्या वेणा