STORYMIRROR

Nisha Kale

Classics

3  

Nisha Kale

Classics

दिवाळी पहाट

दिवाळी पहाट

1 min
811

धुक्याचा गारवा

दवबिंदूनी भिजलेली वाट

आनंदाची घेऊन लाट

आली दिवाळी पहाट


सुशोभित रांगोळी

झेंडूची तोरणे

दिव्यांची आरास

फराळाचा थाट


पवित्रता, मांगल्य

नात्यांचे हिंदोळे

तेजोमयी उत्सव

चैतन्याचे सोहळे


आनंदे उजळो आयुष्य

असो सदैव समाधान

सुख समृद्धीची बहार असो

व्हावे यशाचे नव किर्तीमान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics