STORYMIRROR

Pandit Warade

Abstract Romance

2  

Pandit Warade

Abstract Romance

सोनचाफा

सोनचाफा

1 min
3.9K


सोनचाफा बहरलासे, ज्वानीही बहरात आहे ।

ये सख्या जवळी असा पौर्णिमेची रात आहे।।


आठवण येता तुझी, जीव कासावीस आहे ।

रात पुनवेची असूनि विरह अग्नी आत आहे ।।


सोबतीला चंद्र आहे तारका मजेत आहे ।

तुजवाचून सख्या परी मन हे अशांत आहे ।।


कंचुकी ही चंदनाची जाळते अंगास आहे।

दाह का हा एवढा मी जरी बर्फात आहे ।।


रातराणीच्या फुलांचा गंध हा चोहीकडे

काया ही गंधाळलेली ज्वानीच्या भरात आहे ।।


साद घालते तुला प्रेमिका रे मी तुझी ।

"पंडिता" तुझ्या मिठीत आज मी सुखात आहे ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract