संत रोहिदास महाराज
संत रोहिदास महाराज
शीर्षक - महान संत
गोवर्धनपूर गावात झाला
जन्म संत रोहिदासांचा
वडिलांच्या देखरेखीखाली
व्यवसाय चपला बनविण्याचा......१
गोडी अध्यात्माची
बालपणीच लागली
आज्ञाधारकपणा अन
कर्तृत्वनिष्ठा जपली....२
असेल मनात शुद्ध भाव
अंतकरणात देवाचा वास
ह्दयी असावी सतत
ईश्वरभेटीचीच आस.....३
जातिभेद,धर्मभेद होता
फोफावला जगतात
कुप्रथा विरूद्ध लढते
हिंमतीने समाजात....४
उपदेश व भक्ति ने
कल्याणाचा मार्ग
दाखवाला समाजाला
जीवन जगण्याचा मार्ग... ५