Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

संकल्प नववर्षाचा

संकल्प नववर्षाचा

1 min
109


भारताला महासत्ता बनविण्याचा 

संकल्प नववर्षाचा करुया,

घोटाळे, भ्रष्टाचार करून बंद

मार्ग विकासाचा धरु या


देशासाठी जगण्या, मरण्याचे

संकल्प नववर्षाचे करु,

एकतेने नांदू सारे सुखाने

बंधुभावाचे बिज पेरु


सद्विचार, सदवर्तन, सन्मार्गाने

जगू आपण अवघं आयुष्य,

मानवता, नितीमत्ता जोपासू

तरच उज्ज्वल होईल भविष्य


आतंकवाद, नक्षलवाद, दहशतवाद

नको मुळीच ती हिंसा,

धर्म एकच तो मानवता

माणूस म्हणून जग माणसा


नववर्षाचे नवीन संकल्प

राष्ट्रोद्धाराचे आपण करू,

गाठू यशाचे उंच शिखर

नवी वैज्ञानिक क्रांती करू


नाव जगी या करु देशाचे

जगी महान हा भारत खूप,

गरीबी, बेकारी नको भेदभाव

नववर्षाचे करुया संकल्प


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract