संघटन
संघटन


कोणतेही काम जे एकट्याने होत नाही
तुमच्या हक्काचे तुम्हाला कोणी देत नाही
अशा वेळेस संघटीत होउन काम करा
आपले हक्क मिळविण्यास एकत्र येऊन लढा करा||
संघटनेत काम करणारा जागरूक असतो
त्यासाठी काहीही करायला तो उत्सुक असतो
संघटनेच्या क्षमतेवर सर्वांचा विश्वास असतो
संघटनेचे काम हा महत्वाचा पार्ट असतो||
संघटनेत सर्व निस्वार्थ काम करतात
कधी बुद्धीचे तर कधी शरीराचे श्रम करतात
संघटनेत सर्व कामाचे संकल्प करतात
न होणारे कामही सहज पूर्ण करतात||
संघटनेच्या बहाण्याने सर्व एकत्र येतात
सभा घेऊन आपले विचारही मांडतात
सर्वांशी आपणहून बंधुभाव जपतात
एकदुसऱ्यासाठी मिळून लढाही देतात||