संडे स्पेशल..
संडे स्पेशल..
ती असो गृहिणी वा असो नोकरदार
रवीवारच्या सुट्टीचे तिला नसतेच कौतुक फार.
कामांचा आगडोंब आणि फरमाईशांची यादी
रवीवारच्या सुट्टी जणु जिवघेणी तिच्यासाठी..
कपड्यांचा ढीग,भांड्यांचा पसारा
जळमटं काढा, खिडक्या झाडा
घरभर कामांचा उच्छाद सारा..
नाश्त्यासाठी पोहे नको इडली हवी
कुणी म्हणे सांभारा सोबत जरा चटणीही असावी..
सुट्टी रविवारची असते सर्वांची हक्काची
तिला मात्र चहा प्यायला वेळ नाही जरा सवडीची ..
दुपारच्या जेवणात हवे सर्वांना काहीतरी संडे स्पेशल
दोन भाज्यां सोबत कढी
तरीही तोंडी लावायला कोथिंबीर वडी..
सकाळपासून कामं आवरता -आवरता होऊन जाते दुपार
तिच्या साठी कोणती सुट्टी आणि काय कामाचा रविवार..