समृद्ध कोकण
समृद्ध कोकण
निळाशार समुद्र सभोंवताल हिरवागार निसर्ग
साद घालतो मज कोकणचा स्वर्ग
बहरते आमराई बहरते काजुची वाडी
रानमेव्याने बहरते कोकणची वनराई
हिरवागार निसर्ग फुलवतं कोकणच नंदनवन
नारळाच्या झाडाने व्यापलय प्रत्येक घराच अंगण
उंच उंच सुरुची वनात मंद वाऱ्याची झुळूक
पकडापकडी खेळायला तिथे येतो हुरूप
उंच उंच फेसाळणाऱ्या बेभान लाटा
बेभान होऊन किनाऱ्यावर धडकतात
काही मिठीत सामावतात तर काही खडकावर आदळतात
आनंदाचा अनुभव देऊन क्षणात लुप्त होतात
उंच उंच आकाशी पक्ष्यांची स्वच्छंद भरारी
पक्ष्यांच्या किलबिलाटांनी सारा आसमंत उजळी
सण-उत्सव शिमग्याचा व गणपतीचा
कोकणी माणसाच्या प्रेमाचा, उत्साहाचा
कोकणच्या मातीचा गंध, मातीची ओढ
साद घालतो मज कोकणचा स्वर्ग
समृद्ध कोकण निसर्गाचं अनोखं दान
कोकण आहे आपल्या महाराष्ट्राची शान