समेट ....
समेट ....
जेंव्हा पावसाने दुष्काळाशी
संगनमत करून
घेतली फारकत ,
तेव्हा मात्र ही गोष्ट
मातीच्या वर्मी लागली ....
मग मात्र ,
मातीनेही सूर्याशी संधान बांधले ....
जमिनीवरील आणि आतील
पाण्यावर
खावटीचा दावा दाखल केला ....
मग काय ,
हा:हाकार माजला सर्वत्र ,,,,
शेवटी
निसर्गाने पुढाकार घेतला ....
पाऊस आणि मातीचे
समुपदेशन केले
आणि
देव - दानव आणि मानव
साक्षीने
समेट घडवून आणला दोघांत ....
आणि
दोघांच्या मनोमिलनाने
चैतन्य पसरले सर्वत्र ....!!!!
