समाज जीवन... अथांग दुख सागर
समाज जीवन... अथांग दुख सागर
दु:ख गजबजलेल्या
असे अथांग भावना
मनी वेदनेच्या ज्वाला
सुख काही गवसेना !
ज्याचे दु:ख पाहता हो
किंबहुना भासे माझे
एकरुप समानता
परिस्थिती चित्र माझे
बळीराजा देह त्यागे
कर्ज डोंगरी ते पाहे
आस जगण्याची त्याला
परी मृत्यू का तो पाहे ?
गीते जीवनाची येथे
झाली बेकार धोरणे
पैसा झाला आता देव
स्वस्थ हो झाले मरणे
दोन घासाची यात्रा
बोले संघर्षाची भाषा
हरवल्या मानवा रे
भविष्याच्या गाथा
