समाधान
समाधान
साई राम साई श्याम म्हणा म्हणा
मानवाचा जन्म नाही पुन्हा पुन्हा
नियतीचा खेळ हा जुना जुना
भोगा साठी घडवितो गुन्हा गुन्हा , पुन्हा पुन्हा ।।धृ।।
मोह माया लोभी काया वासनांची भुतं
पुण्याईची वाट चुकली नशिबाची खंत
वैभवाच्या राशीलाही नाही वरदान
मुखी साई नाम घ्या हो मिळे समाधान ।।१।।
वाल्याकोळी ची ही पापं नाही भागीदार
माझे माझे म्हणता म्हणता फिरवी दारोदार
काळाचे ठेवी जो भान होई तो महान
मुखी साई नाम घ्या हो मिळे समाधान ।।२।।
क्षणभराची किमया सारी क्षणांचीच करणी
पुण्याईचे राज मार्ग साईंच्या या चरणी
काळजी नको उद्याची पेटू द्या ती रान
मुखी साई नाम घ्या हो मिळे समाधान ।।३।।
।।सद्गुरू साईनाथ महाराज कि जय ।।
