सलाम
सलाम
राष्ट्रासी सर्वस्व अर्पितो
कुटुंब त्यागतो
सैनिक तो
जात पंतही नसे जयाला
राष्ट्रच धर्म
सैनिक तो
पत्र येता भरतीचे तो
अर्धी शर्यत तिथेच जिंकतो
हर्ष त्याचा स्वप्न पूर्तीचा
परिवार मात्र पोखरतो
खुशीत जातो निरोप घेतो
मागे वळूनही बघत नाही
चिंता नसावी लगेच येतो
म्हणतो वाट पहा माझी
चूल बसवितो छप्पर देतो
निरोप घेतो येतो म्हणुनी
येतो म्हणुनी जातो पण मग
उरतात फक्त त्या आठवणी
ठाऊक नसते काय त्यागतो
काय राहिले माघारी
लढतो फक्त धेय्य सीमेवर
सोडून साऱ्या आठवणी
देशासाठी लढतो त्याला
आई वडील कुणीच नसते
अर्धांगिनी मग रायफल त्याची
अन् मातीच त्याची आई असते
नसते पर्वा स्वतः जीवाची
मृत्यूशी दिनरात खेळतो
जिंकला तर अभिमान स्वतःचा
हरला तर मग शाहिद म्हणवतो
शाहिदाची ती पत्नी वीर तर
आई वडीलहीहेलावतात
इतरांमात्र दुःख क्षणिक ते
नंतर सारेच विसरून जातात
अखंड लढतो तो सीमेवर
बिंधास्त श्वासही आपण घेतो
सलाम माझा त्या सैनिका
त्यांमुळेच आपण जगतो
