"सलाम सैनिक हो"
"सलाम सैनिक हो"
सलाम सैनिक हो तुमच्या देशकार्याला
तुम्ही दिलेल्या अपूर्व बलिदानाला
नमन माझे तुमच्या या देशप्रेमाला
तुम्ही सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला
भारतमातेचा हरेक जवान म्हणजे
जणू ३६ हत्तींचे बळ
ज्याला पाहताच शत्रूच्या
छातीत येते कळ
तुम्ही देशासाठी लढता, देशासाठी मरता
कुटुंबाला विसरून आपल्या वीरगतीस प्राप्त होता
सियाचीनच्या हवामानात पाय रोवून उभे राहता
जणू हिमालयच उभा राहिलाय याची आठवण करून देता
तुमचे हे देशप्रेम म्हणजे
देशाच्या प्रत्येक शत्रूचा कर्दनकाळ
तुम्ही आहात म्हणूनच आम्ही पाहतो आहे
भारतमातेचा सुवर्णकाळ
देशाच्या प्रत्येक कोन्यातून
तिरंगी वारे वाहे
भीती कोणाची आम्हास
सीमेवर 'भारतीय जवान' आहे
