"सलाम सैनिक हो"
"सलाम सैनिक हो"
धैर्य, साहसे ठाण मांडती
शत्रूचे मनसुबे खांडती
झोप सुखाची आम्हांस देण्या
सीमेवरती रक्त सांडती
ऊर भरून येतो अभिमाने
वंदे मातरम् आमच्या ओठी
सलाम सैनिक हो.....
आमचा तुम्हांस कृतज्ञतेपोटी
आम्हांस नसे भय अन् चिंता
तुमच्या रूपात आमचा भाग्यविधाता
सण-उत्सव जेंव्हा होती साजरे
आठवण तुमची येता-जाता
रूखरूख जाणवते अंतरात
अश्रू जमती पापण्यांकाठी
सलाम सैनिक हो.....
आमचा तुम्हांस कृतज्ञतेपोटी
देशासाठी तुमचे लढणे-मरणे
शहिदास अलंकृत तिरंगी उपरणे
केवळ मेणबत्ती आता लावणे नाही
तुमच्या निष्ठेस आमचे जतन करणे
तुमच्या पावलांवर ठेवण्या पावले
आमचीही देऊ लेकरे तिरंग्यासाठी
सलाम सैनिक हो.....
आमचा तुम्हांस कृतज्ञतेपोटी
'विजयी भव' सदिच्छा आमची
तुम्हांस नमन शत् शत् कोटी
सलाम सैनिक हो.....
आमचा तुम्हांस कृतज्ञतेपोटी
सलाम सैनिक हो.....
आमचा तुम्हांस कृतज्ञतेपोटी
