STORYMIRROR

Narendra Patil

Others

3  

Narendra Patil

Others

माझी कविता

माझी कविता

1 min
165

चार भिंती ओलांडून, 

मोकळा श्वास घेण्यासाठी

तळमळत असते माझी कविता. 


उसवलेल्या जखमांतून, 

भळाभळा वाहताना

हळहळत असते माझी कविता. 


मोगरा, गुलाब, केवडा होवून, 

श्वासांच्या आवर्तनांतून

दरवळत असते माझी कविता. 


जगण्याची जिद्द शिकवणाऱ्या, 

पिंपळाच्या पानांसारखी

सळसळत असते माझी कविता. 


झपाटलेल्या कवीमनाला, 

सहस्त्र शब्दहस्तांनी

कुरवाळत असते माझी कविता. 

..... 


Rate this content
Log in