संदेह
संदेह
विठू तुझे रुप
सगुण निर्गुण
मन हे तल्लीन
तुझे पायी
विठू तुझे नाम
मुखी सदोदित
तुझे ठायी प्रीत
नरेंद्राची
विठू तुझी भक्ती
परमार्थ योग
मिटे सारा क्षोभ
संसाराचा
विठू तुझी आस
माझिया मनास
आलो दर्शनास
कृपावंत
भय काळजात
शिणला बा देह
मनास संदेह
मिलनाचा
नको आता जन्म
मृत्यूचा हा फेरा
जगी येरझारा
संपवावी
