वाट
वाट
मनात माझ्या उसळलेली
लाट वेगळी होती
अन् चालावया तू निवडलेली
वाट वेगळी होती
लाटेचं त्या वाटेवरती
जाणं कठीण होतं
कारण तिचं जीणं
सागराच्या अधीन होतं
पण आस मिलनाची
उरात शेष अजून आहे
लपविण्या धग अंतरीची
ती नखशिखांत भिजून आहे
पुन्हा पुन्हा ती जन्मते
धावते किनाऱ्यावरती
हिरसमुली होवून आदळते
तुझ्याच वाटेवरती
जोवर आहे आस तुझी
ती आयुष्य उधळत राहील
अन् पाहताना वाट तुझी,
तुझी ती वाट भिजवत राहील
